श्रीमंतांनी गॅस सबसिडी घेऊ नये

शनिवार, 28 मार्च 2015 (10:43 IST)
‘येत्या चार वर्षात देशातील 1 कोटी कुटुंबांना पाइप गॅस पुरविण्याचे सरकारचे लक्ष्य आहे,’ असे सांगतानाच, ‘सरकारकडून घरगुती गॅसवर मिळणारी सबसिडी श्रीमंतांनी स्वेच्छेने नाकारावी, जेणेकरून तो पैसा गरिबांसाठी वापरला जाईल,’ असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. दिल्लीत झालेल्या ‘ऊर्जा संगम-2015’ या कार्यक्रमात ते बोलत होते. ‘सरकारच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन आतापर्यंत 2 लाख 8 हजारांहून अधिक ग्राहकांनी सबसिडी नाकारली आहे. त्यामुळे सरकारी तिजोरीत 100 कोटी रुपयांची भर पडली आहे. हा पैसा गरिबांसाठी वापरला जाणार आहे. त्यामुळे ज्या नागरिकांना बाजारभावातील गॅस परवडत असेल त्यांनी सवलत नाकारली पाहिजे,’ असे मोदी म्हणाले.
 

वेबदुनिया वर वाचा