शशी थरूर यांच्या ‘पॉलिग्राफ टेस्ट’ची शक्यता

बुधवार, 1 जुलै 2015 (09:34 IST)
नवी दिल्ली- बहुचर्चित सुनंदा पुष्कर मृत्यूप्रकरणी त्यांचे पती आणि काँग्रेसचे नेते शशी थरूर यांची ‘पॉलिग्राफ टेस्ट’ होण्याची शक्यता आहे. दिल्ली पोलिसांचे विशेष तपास पथक (एसआयटी) कोर्टात अर्ज करणार आहे. दिल्ली पोलिसांनी या आधी अनेकदा शशी थरूर यांची चौकशी केली आहे.
 
सुनंदा पुष्कर मृत्यूप्रकरणी एसआयटीने आतापर्यंत सहा जणांची पॉलिग्राफ टेस्ट केली आहे. यात शशी थरूर यांचा नोकर नारायण सिंह, ड्रायव्हर बजरंगी आणि मित्र संजय धवनचा त्यात समावेश होता. याशिवाय एस.के. शर्मा, विकास अहलावत आणि सुनील तकरू यांनाही पॉलिग्राफ टेस्टला सामोरे जावे लागले होते. या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचे दिल्लीचे पोलिस आयुक्त बी. एस. बस्सी यांनी सांगितले. गरज वाटल्यास पोलीस आणखी काही जणांची पॉलिग्राफ टेस्ट करतील. अद्याप करण्यात आलेल्या टेस्टचा अहवाल हाती आलेला नाही.

वेबदुनिया वर वाचा