विर्क राज्याचे नवे पोलिस महासंचालक?

भाषा

गुरूवार, 5 फेब्रुवारी 2009 (15:03 IST)
महाराष्ट्राचे पोलिस महासंचालक अनामी रॉय यांना पदावरून हटविण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिल्यानंतर आता पंजाबचे माजी पोलिस महासंचालक एस. एस. विर्क हे या नवे महासंचालक बनतील अशी चिन्हे दिसत आहेत.

रॉय यांना श्री. विर्क तसेच सुप्रकाश चक्रवर्ती व जे. डी. वीरकर हे वरिष्ठ आहेत. तरीही त्यांना डावलून रॉय यांना महासंचालक करण्यात आले होते. त्याला चक्रवर्ती यांनी सेंट्रल एडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रायब्युनल अर्थात कॅटमध्ये आव्हान दिले होते. कॅटनेही सरकारवर ताशेरे ओढत रॉय यांची नियुक्ती नियमबाह्य ठरवली होती.

आता रॉय यांना हटविण्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिल्याने त्यांच्या जागी विर्क यांची नियुक्ती होण्याची शक्यता आहे. दरम्यान, याविषयीचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान द्यायचे की तो निर्णय मान्य करायचा या सरकारच्या भूमिकेवर अवलंबून आहे. कोर्टाने नव्या पोलिस महासंचालकांची नियुक्ती करण्यासाठी सरकारला चार आठवड्यांचा अवधी दिला आहे. रॉय यांची नियुक्ती फेब्रुवारी 2008 मध्ये करण्यात आली होती.

वेबदुनिया वर वाचा