वाघांना ‘अच्छे दिन’

बुधवार, 21 जानेवारी 2015 (10:52 IST)
वाघांच्या संरक्षणासाठी गेल्या काही वर्षांपासून सुरु असणार्‍या प्रयत्नांना अखेर काहीसे यश मिळाल्याचे दिसू लागले आहे. २०१०च्या तुलनेत देशात तब्बल ३० टक्के वाघ वाढले असून त्यांची संख्या दोन हजार २२६ वर पोहोचली आहे, अशी माहिती केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज जाहीर केली. विशेष म्हणजे जगभरात वाघांची संख्या घटत असताना भारतात मात्र त्यांची वाढ झाल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे.
 
वाघांच्या संख्येत कर्नाटक पहिल्या क्रमांकावर आहे. नंबर वन आहे. येथे तब्बल ४०६ वाघांची नोंद झाली आहे. उत्तराखंडमध्ये ३४० वाघांची नोंद झाली आहे. केरळात १३६, तर तामिळनाडूत २२९ वाघ नोंदविले गेले आहेत.

वेबदुनिया वर वाचा