वरुण गांधी यांना सरकारकडून सुरक्षा

पीलीभीत येथील भाजपचे उमेदवार वरुण गांधी यांना उत्तर प्रदेश सरकारकडून एक खाजगी सुरक्षा अधिकारी (पीएसओ) तसेच एक स्काट वाहन अशी व्हीआयपी सुरक्षा व्यवस्था उपलब्ध करून दिली.

गृह सचिव महेश गुप्ता यांनी सांग‍ितले की, राज्य सरकारकडून वरुण गांधी यांना झेड सुरक्षा उपलब्ध करून दिली जाऊ शकत नसल्याने त्यांना एक पीएसओ व एक स्काट वाहनद्वारे सुरक्षा व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली.

वरुण गांधी यांच्याकडून सुरक्षा व्यवस्था वाढविण्याबाबत कोणत्याच प्रकारची मागणी करण्यात आलेली नाही. वरुण गांधी यांना आतापर्यंत एक्स श्रेणीची सुरक्षा व्यवस्था देण्यात आली आहे.

वेबदुनिया वर वाचा