'लष्कर ए तोयबा'च्या दहशतवाद्याला दिल्लीत अटक

मंगळवार, 29 जुलै 2014 (10:57 IST)
दहशतवादी संघटना लष्कर- ए- तोयबाच्या एका दहशतवाद्याला दिल्ली पोलिसांना अटक केली आहे. अब्दुल सुभान (42) असे या दहशतवाद्याचे नाव आहे. गेल्या आठवड्यात सराय काले खां बस स्टँडवरून अटक करण्यात आली होती. चौकशी दरम्यान त्याने राजस्थान, हरियाणा तसंच बिहारच्या युवकांना प्रभावित करण्याचा खुलासा केला आहे. 
 
युवकांची मने वळवणे, त्यांना भडकावून, त्यांना दहशतवादी संघटनांमध्ये सहभागी होऊन, देशभर दहशतवादी हल्ल्यांना मूर्त स्वरुप देण्याचा कट रचणे तसेच दहशतावादी कारवाया करण्याची जबाबदारी अब्दुल सुभानवर सोपवली होती. ळ
 
सूत्रांच्या मिळालेल्या माहितीनुसार, या दोघांनी सुभान हा लष्कर ए तोयबाच्यावतीने तरुणांची भरती करत असल्याची माहिती दिली होती. त्यानंतर, सुभानच्या अटकेसाठी सापळा रचण्यात आला होता.

वेबदुनिया वर वाचा