चंदीगड- ते प्रियकर आणि प्रेयसी म्हणून चॅट करत एकमेकाच्या प्रेमात पडले, पण खरं समोर आल्यावर दोघेही हैराण झाले. कारण डेटिंगवर एकमेकासमोर गेल्यावर ते पती-पत्नी निघाले आणि मग प्रकरण मारहाण आणि पोलिसांपर्यंत पोहचलं.
पोलिसांप्रमाणे हे जोडपं मागील 15 दिवसापासून एकमेकाशी चॅट करत होतं. दोघांनी फेसबुकवर वेगळेच फोटो अपलोड केलेले होते. दोघांमध्ये मैत्री झाली आणि भेटण्याची वेळ ठरली. ते दोघं एकमेकाला शांतिकुंज पार्क येथे भेटायला पोहचले. एकमेकासमोर आले तर हैराण झाले आणि मारहाण सुरू झाली. पोलिसांना प्रकरण शांत करावे लागले.