'रेल्वे किंवा बसने देशात कुठेही 24 तासांत पोहोचा'

बुधवार, 23 जुलै 2014 (14:33 IST)
देशात रस्ते आणि रेल्वेमार्गाचे जाळे अधिक मजबूत  करण्यासाठी मोदी सरकारतर्फे प्रयत्न सुरु आहेत. त्यामुळे रेल्वे किंवा  बसने देशाच्या काण्याकोपर्‍यात पोहोचण्यासाठी प्रवाशांना फक्त 24  तास लागतील असा मोदी सरकारचा मानस आहे. तसेच प्रवास  करतानात प्रवाशांची विशेष काळजीही घेतली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
 
तसेच देशातील दुरध्वनीमध्येही सुधारणा व्हावी म्हणून एसटीडी कॉल  हा लोकल कॉल होणार आहे. कामगारांच्या कौशल्याला चालणा  देण्याच्या दृष्टीकोणातून  काढलेल्या 17 मुद्यांचा प्रस्ताव पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांनी आपल्या मंत्रिमंडळाला दिला आहे. यापूर्वी मोदींनी  10 जुलै रोजी आपल्या सर्व मंत्र्यांना आपला विकासाभिमूख अजिंडा  पत्राद्वारे पाठवला होता. त्यानुसार कोणत्या योजना अंमलता आणता  येतील,तसेच कोणत्या गोष्टीवर अधिक भर दिला जावा, यासाठी  मोदींनी आपल्या मंत्र्यांना सांगितले होते. 
 
पुढील महिन्यांत मोदी सरकारला 100 दिवस पूर्ण होणा आहेत. या  पार्श्वभूमीवर देशातील जनतेसाठी आपला अजिंडा सादर करण्‍याची  शक्यता आहे. देशातील सेवाउदीष्ठांना बळकटी आणण्याचेही मत मोदी  यांनी व्यक्त केले होते त्यानंतर पूर्रू-पश्चिम सागरीमहामार्ग  उभारण्यावरही सरकारचा भर असणार आहे.

वेबदुनिया वर वाचा