रेल्वे ई-तिकीटावर मर्यादा!

बुधवार, 25 मार्च 2015 (10:39 IST)
एजंटांना चाप लावण्यासाठी रेल्वे प्रशासनाने आॅनलाईन तिकीट बुकींवर मर्यादा आणल्याने प्रवाशांची गैरसोय होणार आहे. यापुढे ऑनलाईन तिकीट एकावेळी एकाच रेल्वेचे बुकींग करता येणार आहे. गर्दीच्यावेळी ही मर्यादा असणार आहे.
 
दरम्यान, परततानच्या प्रवासावेळी मात्र ही मर्यादा असणार नाही. एक युजर लॉगिनवर एकच तिकीट आरक्षित करण्यात येणार असल्याने रेल्वे मंत्रालयाच्या या निर्णयामुळे सुटीच्या हंगामात प्रवाशांची गैरसोय वाढणार, हे नक्कीच.

वेबदुनिया वर वाचा