राहुल गांधीला ठार मारण्याची धमकी, गृहमंत्रीशी भेटणार काँग्रेस नेते

सोमवार, 9 मे 2016 (15:32 IST)
काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांना ठार मारण्याची धमकी मिळाल्यामुळे पक्षनेते आज गृहमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेणार आहे. काँग्रेस नेता आनंद शर्मा, अहमद पटेल, राजीव शुक्ला आणि मोतीलाल वोरा दुपारी राजनाथ सिंह यांची भेट घेतील.  
 
भेटीमध्ये काँग्रेस नेते धमकीच्या प्रकरणाची चाचणी करण्याची मागणी करणार आहे. काँग्रेसची पुडुचेरी युनिटाने दावा केला आहे की राहुल गांधी यांना जीवा मारण्याची धमकी मिळाली आहे. धमकी असलेले पत्र तमिळमध्ये लिहिलेले आहे.  
 
राहुल गांधी मंगळवारी पुडुचेरीमध्ये निवडणुक सभेला संबोधीत करणार आहे. पुडुचेरीत 16 मे रोजी विधानसभा निवडणूक होणार आहे.  

वेबदुनिया वर वाचा