राहुल गांधींची 'लेडी लव्ह' अफगाणी राजकन्या?

वेबदुनिया

बुधवार, 27 जून 2012 (12:44 IST)
PR
काँग्रेसचे युवराज राहुल गांधी यांच्या आयुष्यातील 'लेडी लव्ह'ही अफगाणिस्तानची राजकुमारी असल्याचे वृत्त एका इंग्रजी दैनिकाने प्रकाशित केले आहे. दैनिकातील वृत्तानुसार, अफगाणिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष मोहम्मद जहीर शाह यांची नात राहुल गांधींची गर्लफ्रेंड असल्याचा दावा करण्यात आला आहे.

'द संडे गार्डियन'मध्ये छापलेल्या वृत्तात म्हटले आहे, की अफगाणिस्तानच्या या राजकन्येने धर्मपरिवर्तन करून ख्रिश्चन धर्म स्वीकाराला आहे. या दोघांना दिल्लीतील हॉटेल अमन येथे अनेक वेळा सोबत पाहण्यात आले आहे. राहुल गांधी या हॉटेलच्या फिटनेस सेंटरमध्ये बराच वेळ घालवितात. या वृत्तामध्ये त्या राजकन्येचे नाव प्रसिद्ध करण्यात आलेले नाही. तिचे आजोबा जहरी शाह यांनी 1933 ते 1973 या कालावधीत अफगाणिस्तानावर सत्ता गाजविली. त्यानंतर त्यांच्या भावाने सत्ता उलथविली. तेव्हापासून ते इटलीमध्ये वास्तव्यास होते. 2002मध्ये ते अफगाणिस्तान परतले. अखेर 2007मध्ये त्यांचा मृत्यू झाला.

वेबदुनिया वर वाचा