राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आता फुल पॅन्टमध्ये

सोमवार, 14 मार्च 2016 (09:56 IST)
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या गणवेशात बदल करण्यात आला आहे. खाकी हाफ पॅन्टच्या जागी आता तपकिरी रंगाची फुल पॅन्ट असणार आहे, अशी माहिती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भैय्याजी जोशी यांनी दिली.
 
आता सर्वजण फुल पॅन्ट परिधान करतात. त्यामुळे आम्ही फुल पॅन्टचा आम्ही स्वीकार केला आहे. शिवाय, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काळानुसार परिवर्तन करणारी संघटना आहे.” असेही यावेळी भैय्याजी जोशी यांनी सांगितले. तपकिरी रंगाची पॅन्ट सगळीकडे उपलब्ध होऊ शकेल, म्हणून हा रंग निवडण्यात आला आहे. त्यामुळे यामागे काही विशेष कारण नाही, असेही भैय्याजी जोशींनी स्पष्ट केले.

वेबदुनिया वर वाचा