राष्ट्रीयपुरस्कारांमध्ये मराठी चित्रपटांचा झेंडा

बुधवार, 25 मार्च 2015 (10:25 IST)
६२ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये मराठी चित्रपटांनी झेंडा रोवला आहे. विशेष म्हणजे 'कोर्ट' चित्रपटाला देशातील सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे. 'एलिझाबेथ एकादशी', 'किला' 'मित्रा' या चित्रपटांनीही पुरस्कार पटकाविले आहेत. 'एलिझाबेथ एकादशी' चित्रपटाला सर्वोत्कृष्ट बालचित्रपट, 'किला' या मराठी चित्रपटाला विशेष उल्लेखनीय चित्रपटाचा पुरस्कार आणि 'मित्रा' ला बेस्ट शॉर्ट फिल्मचा पुरस्कार मिळाला. हिंदीमध्ये 'क्वीन' हा सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला असून 'मेरी कोम'ला लोकप्रिय चित्रपट , 'भूतनाथ रिटर्न्स'ला विशेष उल्लेखनीय पुरस्कार आणि विशाल भारद्वाज यांना 'हैदर'साठी सर्वोत्कृष्ट संगीतकाराचा पुरस्कार घोषित करण्यात आला.  कंगना राणावतला 'क्वीन' चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार जाहीर झाला. 

वेबदुनिया वर वाचा