राष्ट्रपती बागडोगरा येथून ते दिल्लीला परतणार होते. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या ताफ्यामागे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा वाहन ताफा होता. पावसामुळे रस्ते निसरडे झाल्याने हा अपघात झाला. अपघातानंतर ममता बॅनर्जी गाडीतून उतरल्या आणि बचाव कार्यात गुंतल्या. जखमींना दार्जिलिंग येथील रुग्णालयात दाखल केले आहे.