शुक्रवारी सकाळी जनता साधारण एक्सप्रेस बछरावा रेल्वे स्थानकाजवळ इंजिनच्या मागील दोन डबे रुळांवरुन घसरले. या एक्सप्रेसला बछरावा स्टेशनवर थांबा होता पण गाडी तिथे थांबली नाही व स्टेशनपासून पुढे जाऊन या ट्रेनचे चार डबे रुळांवरुन घसरले. एक्सप्रेसचे ब्रेक न लागल्याने हा अपघात झाला असावा अशी शक्यता आहे.