रामदेवबाबांच्या भावाला न्यायालयीन कोठडी

शुक्रवार, 29 मे 2015 (10:29 IST)
येथे पतंजली हर्बल फूड पार्कमध्ये दोन गटांत तुंबळ हाणामारीनंतर झालेल्या गोळीबारात एकाचा मृत्यू झाल्याप्रकरणी अटक करण्यात आलेला योगगुरू रामदेवबाबा यांचा भाऊ रामभरत याला गुरुवारी न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
 
हरिद्वारच्या वरिष्ठ पोलीस अधीक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार, हर्बल फूड पार्कमध्ये कॉन्ट्रॅक्टच्या वादातून सुरक्षा रक्षक आणि कामगारांमध्ये तुंबळ हाणामारी व गोळीबार झाला होता. या प्रकरणी आम्ही रामभरतला अटक केली होती.

वेबदुनिया वर वाचा