राजस्थानात मिग कोसळले

रविवार, 11 सप्टेंबर 2016 (10:10 IST)
राजस्थानमधील बारमेर जिल्ह्यात शनिवारी सकाळी भारतीय हवाई दलातील मिग-21 प्रकारातील एक लढाऊ विमान कोसळले. सुदैवाने या दुर्घटनेतून वैमानिक बचावला आहे.
 
सुत्रांच्‍या माहितीनुसार, नेहमीप्रमाणे विमानाचे उड्‍डाण झाले होते. विमान कोसळल्‍याची माहिती मिळताच वायुसेनेचे अधिकारी आणि पोलिसांनी घटनास्‍थळी धाव घेतली आहे. जखमी वैमानिकाला रुग्‍णालयात नेण्‍यात आले आहे. या घटनेची चौकशी करण्‍याचे आदेश देण्‍यात आले आहेत.    
 

वेबदुनिया वर वाचा