रघुराम राजनना हटविण्याची स्वामी यांची मागणी

नवी दिल्ली- धाडसी निर्णय आणि करारी बाण्यासाठी ओळखले जाणारे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांना पदावरून हटवण्याची मागणी करून राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामींनी अनेकांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. राजन यांची धोरणे, अर्थनीती भारतासाठी अनुकूल नाही, त्यांना पुन्हा शिकागोला प्राध्यापकी करायला पाठवायला हवे, अशी टिप्पणी केली.
 
चलन फुगवटा कमी करण्यासाठी व्याजदर वाढवण्याच्या रघुराम राजन यांच्या निर्णयामुळे देशाचे मोठे नुकसान झाल्याचे मत स्वामींनी मांडले. व्याजदर वाढवल्याने बेकारी वाढली, महागाई वाढली आणि देशाचा जीडीपी दर घटल्याचे निरीक्षण त्यांनी नोंदवले. देशाला राजन यांच्या धोरणांची गरज नाही, असा टोलाही स्वामींनी हाणला.

वेबदुनिया वर वाचा