याकूब मेमनला फाशी

गुरूवार, 30 जुलै 2015 (09:58 IST)
नागपूर- नागपूर मध्यवर्ती कारागृहात आज सकाळी साडेसहा वाजता याकूब मेमनला फाशी देण्यात आली. याकूब मेमनच्या वकिलांनी ऐनवेळी फाशीच्या शिक्षेला खोडा घालण्यासाठी दाखल केलेली अखेरची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावल्यानंतर याकूबला फाशी देण्यात आली. 
 
याकूबच्या फाशीवर सर्वोच्च न्यायालयाने आज पहाटे पाच वाजता शिक्कामोर्तब केले होते. त्यानंतर त्याला साडेसहा वाजता फासावर लटवण्यात आले. याकूबच्या फाशीचे व्हिडिओ चित्रीकरण करण्यात आले असून त्याला फाशी देताना सहा अधिकारी उपस्थित होते. याकूबचे शवविच्छेदन कारागृहातच करण्यात आले असून, त्यानंतर त्याचा मृतदेह त्याच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात येणार आहे.

वेबदुनिया वर वाचा