याकूबद्या याचिकेवर निर्णय घेणार सरन्यायाधीश

बुधवार, 29 जुलै 2015 (10:45 IST)
1993 च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेला दोषी याकूब मेमनची याचिका सुप्रीम कोर्टाने काल वरिष्ठ खंडपीठाकडे वर्ग केली आहे. या याचिकेबाबत दोन न्यायमूर्तीची वेगवेगळी मते पडल्याने त्यावर आता सरन्यायाधीश निर्णय घेणार आहेत. ही सुनावणी आज होऊ शकते. याकूब मेमनने आपल्यावरील ‘डेथ वॉरंट’विरोधात सुप्रीम कोर्टात दाद मागितली आहे. सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका प्रलंबित असतानाच, ‘डेथ वॉरंट’ जारी करणे बेकायदेशीर असल्याचा युक्तिवाद करत त्याने फाशीच्या अंमलबजावणीला स्थगिती देण्याची विनंती केली आहे. तसेच, एकाच गुन्ह्यासाठी दोन शिक्षा देता येत नाहीत, आपण 20 वर्षे कारावास भोगलेला असल्याने फाशीची शिक्षा रद्द करावी, असेही त्याचे म्हणणे आहे.

वेबदुनिया वर वाचा