यंदा पावसाचं आगमन चार दिवस आधीच

सोमवार, 28 मार्च 2016 (11:54 IST)
यंदा पावसाचं आगमन चार दिवस आधीच म्हणजे 3 जून रोजी होणार असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. यंदा मान्सून केरळात26 ते 27 मे दरम्यान येईल तर कोकणात 28 ते 29 मे दरम्यान दाखल होण्याचाअंदाज आहे.

सध्या मुंबईसह महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात तापमानवाढ दिसून येत आहे.गेल्या तीन वर्षांतील ही मोठी तापमानवाढ असून मान्सूनच्या पथ्यावर पडणारीआहे. फेब्रुवारी आणि मार्चमध्ये राज्यातलं तापमान १.५ ते १.६ अंशांनी वाढलं आहे. हीच परिस्थिती कायम राहिली तर मेच्या शेवटच्या आठवड्यात मान्सून राज्यात दाखल होईल. दरम्यान येत्या 27 आणि 28 मार्च रोजी विदर्भात
गारपीटीसह पाऊस पडणार असल्याची माहिती भारतीय हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. 

वेबदुनिया वर वाचा