म्हातार्‍याने केले 12 वर्षाच्या मुलीसोबत लग्न (व्हिडिओ)

सोमवार, 22 फेब्रुवारी 2016 (18:15 IST)
कलयुगात जे काही घडेल ते कमीच आहे ...आजकाल म्हातारे आपला एकटेपणा दूर करण्यासाठी आपल्याहून कमी वयाच्या मुलीशी लग्न करून स्वत:ला मर्द साबीत करण्यात लागले आहेत. बर्‍याच ठिकाणी म्हातार्‍यांनी आपल्या वयाच्या अर्ध्या वयाच्या मुलीशी लग्न करून त्यांना घरी बसवले आहे, पण नुकतेच असे प्रकरण समोर आले आहे, ज्यात एका म्हातार्‍याने फक्त 12 वर्षाच्या मुलीशी लग्न केले...
12 वर्षाच्या मुलीसोबत लग्न केल्याचा व्हिडिओ वायरल झाला आहे आणि संपूर्ण जगात हा व्हिडिओ फारच आश्चर्याने बघण्यात येत आहे.  या वयस्कर माणसाच्या मनात कुठलीही चुकीची भावना नसून त्याने एका सामाजिक उद्देश्यासाठी हे लग्न केल्याचे कळले आहे. ह्या   वयस्कराला देखील हे माहीत नव्हत की तो 12 वर्षाच्या मुलीसोबत लग्न करून जगभरात एवढा प्रसिद्ध होईल.  
 
भारत समेत जगभरात असे बरेच देश आहे ज्यात नाबालिकशी विवाह करणे बेकायदेशीर आहे आणि असे बघण्यात येते की बर्‍याच देशांमद्ये या कायद्याचे मजाक बनवण्यात येते, म्हणून यूनाइटेड नेशंस पॉपुलेशन फंडने यासाठी एक अनोखा प्रयोग केला, जो बराच कारगर सिद्ध झाला आहे.  

या लग्नाचे मुख्य हेतू लेबनानच्या सरकारवर बाल विवाह थांबवण्याचा दबाव बनवणे होते. यूट्‍टूबवर वायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये  12 वर्षाची नाबालिग मुलगी आणि प्रौढ व्यक्तीला लग्नानंतर फोटो-सेशन करताना दाखवण्यात आले आहे. या दोघांना बघून रस्त्यावर गर्दी जमा होते. या लग्नानंतर जे काही झाले ते जाणून घेण्यासाठी तुम्ही देखील उत्सुक असाल, म्हणून या व्हिडिओवर क्लिक करा ...
 

वेबदुनिया वर वाचा