मोबाइलच्या स्फोटाने मुलाचा मृत्यू

मंगळवार, 31 मार्च 2015 (14:38 IST)
मोबाइलचा स्फोट होऊन त्यात एका सात वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाल्याची घटना पश्चिम बंगालच्या पुरुलिया जिल्ह्यातील चिरुडीह गावात घडली. मोबाइल चार्जवर ठेवण्यात आला होता.

हा मुलगा  मोबाइलजवळ आला असता अचानक स्फोट झाला. गंभीर भाजल्याने त्याचा मृत्यू झाला. स्फोट झालेला मोबाइल फोन चिनी बनावटीचा असल्याचे तपासात आढळले आहे.

वेबदुनिया वर वाचा