मोदींचे भाषण दाखविणची सक्ती

शनिवार, 30 ऑगस्ट 2014 (10:50 IST)
शिक्षकदिनी सर्व शाळांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण दाखवावे, असा फतवा केंद्र सरकारने काढला आहे. शाळेमध्ये दूरदर्शन संच नसेल तर भाडय़ाने अथवा उसना संच आणून विद्यार्थना मोदींचे भाषण दाखवावे असे केंद्रीय आदेशात म्हटले आहे. दुर्गम भागात रेडिओवरून भाषण ऐकवा असेही आदेशात स्पष्ट केले आहे. केंद्रीय मनुष्बळ खात्याने हे आदेश काढले आहेत.

वेबदुनिया वर वाचा