मोदींचे कानडी प्रेम, बेळगावचे झाले ‘बेळगावी’

शनिवार, 18 ऑक्टोबर 2014 (10:35 IST)
मोदी सरकारने कर्नाटकातील बेळगावचे ‘बेळगावी’ असे शुद्ध कानडी नामांतर करण्याच्या प्रस्तावास शुक्रवारी मंजुरी दिली आहे. त्यामुळे सीमा भागातील मराठी अस्मितेला ठेंगा दाखवल्याचा प्रकार करण्यात आला आहे. या निर्णयामुळे बेळगाव- कारवार हा सीमा भाग महाराष्ट्रात समाविष्ट करण्याच्या लढ्याला मोठी खीळ बसणार असल्याचे चित्र दिसत आहे.

केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी कर्नाटकातील बेळगावसह 12 शहरांचे नामांतर करण्याच्या प्रस्तावास मंजुरी दिली. सुमारे आठ वर्षांपूर्वी म्हणजेच 2006 मध्ये कानडी भाषेतील उच्चारांप्रमाणे 12 शहरांच्या नामांतराचा प्रस्ताव पाठवला होता. बेळगाववरून महाराष्ट्र - कर्नाटकात वाद सुरू असतानाही मोदी सरकारने हा निर्णय घेतला आहे.

वेबदुनिया वर वाचा