मागील काही दिवसांपासून मूत्रपिंडाच्या विकाराने त्रस्त असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आध्यात्मिक गुरु स्वामी दयानंद गिरि यांचे बुधवारी रात्री येथे निधन झाले आहे. ते 85 वर्षांचे होते. 'स्वामी दयानंद सरस्वती यांच्या निधनामुळे आपले वैयक्तिक नुकसान झाले आहे. त्यांच्या आत्म्याला शांती मिळो अशी प्रार्थना' असे ट्विट करत मोदींनी त्यांच्या गुरूंच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला.