मोठा दावा, तळिम हिंदू होते ईसा मसीहा

बुधवार, 24 फेब्रुवारी 2016 (12:27 IST)
हे फारच आश्चर्यकरणारी बाब आहे, पण स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या भावाने आपल्या पुस्तकात दावा केला आहे की ईसा मसीहा तमिळ हिंदू होते. गणेश सावरकर यांची ही पुस्तक 70 वर्षांनंतर परत प्रकाशित होत आहे.   
 
स्वातंत्र्यवीर सावरकर नॅशनल मेमोरियलचे अध्यक्ष रंजीत सावरकर यांनी संगीतले की या पुस्तकाला सावरकर यांचे मोठे भाऊ गणेश सावरकर यांनी लिहिले आहे. याला सावरकर यांची पुण्यतिथी अर्थात 26 फेब्रुवारी रोजी प्रकाशित करण्यात येईल. हे पुस्तक पहिल्यांदा  1946 मध्ये प्रकाशित झाले होते.   
 
ईसा मसीहा यांचा भारत भ्रमण?
यात दावा करण्यात आला आहे की ईसाई धर्म आधी हिंदू संप्रदाय होता आणि ईसा मसीहाचा मृत्यू काश्मीरमध्ये झाला होता. असे मानले जाते की काश्मीरच्या पहलगामामध्ये ईसा मसीहाची कबर आहे. काश्मिरात पहलगामाचा अर्थ आहे मेंढपाळांचा गाव. महत्त्वाचे म्हणजे यीशू मुळात मेंढपाळ होता.   
 
‘क्राइस्ट परिचय’ नावाच्या या पुस्तकात दावा करण्यात आला आहे की ‘एस्सेन’ संप्रदायाच्या लोकांनी फाशीवर चढवलेल्या ईसा मसीहाला बचावले आणि हिमालयाच्या औषधीय झाड आणि जडी बुटीने त्यांचा उपचार केला. पुस्तकात हा दावा करण्यात आला आहे की जन्मापासून ते एक ‘विश्वकर्मा ब्राह्मण’होते आणि ईसाइयत हिंदुत्वाचा एक पंथ आहे. हे पुस्तक मराठीत आहे.   
 
ईसा मसीहा फाशीपासून कसे वाचले?
या पुस्तकात असा ही दावा करण्यात आला आहे की फिलिस्तीन आणि अरब क्षेत्र देखील कधी हिंदू भूमी होती आणि ईसा मसीहा भारतात आले होते, जेथे त्यांनी योगाचे प्रशिक्षण घेतले होते. यीशूचे असलं नाव केशव कृष्ण होत. त्यांची मातृभाषा तमिळ होती आणि रंग डार्क होता. 

वेबदुनिया वर वाचा