मुस्लीम आणि ख्रिश्चन युध्दांना कारणीभूत

सोमवार, 22 डिसेंबर 2014 (11:19 IST)
धर्मांतराच्या मुद्यावरून देशात सुरू असलेल्या वाद-प्रतिवादाला विश्व हिंदू परिषदेचे नेते अशोक सिंघल यांनी नवे वादग्रस्त वळण दिले आहे. सिंघल यांनी मुस्लीम आणि ख्रिश्चनांवर थेट टीका केली असून हे दोन धर्मच जगातील युद्धांना कारणीभूत आहेत, असा आरोप केला आहे. सिंघल यांच्या या वक्तव्यामुळे देशातील धार्मिक वातावरण तापण्याची शक्यता आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सिंघल यांनी हिंदुत्ववादी संघटनांकडून सुरू असलेल्या धर्मांतराच्या ‘घर वापसी’ मोहिमेची पाठराखण केली आहे. आम्ही धर्म   परिवर्तन करण्यासाठी नाही तर मनं जिंकण्यासाठी निघालो आहोत, असे ते म्हणाले. जगातील सध्याच्या परिस्थितीवरून जागतिक महायुद्ध अटळ असल्याचे दिसत आहे. 

वेबदुनिया वर वाचा