मुलींनी फेसबूक आणि वॉट्सअॅप वापरू नये- खाप पंचायत

गुरूवार, 20 नोव्हेंबर 2014 (11:40 IST)
उत्तरप्रदेशातील मुझफ्फरनगर येथील खाप पंचायतीने चक्क मुलींनी फेसबूक आणि वॉट्सअॅप वापरू नये, असे फर्मान काढला आहे. जिल्ह्यातील 46 गावांमध्ये लागू करण्यात आले आहे. 
 
मुझफ्फरनगर जिल्ह्यातील शोरम गावात खाप प्रमुखांची बैठक झाली. या बैठकीत खाप पंचायतीने मुलींनी वॉट्स अ‍ॅप आणि फेसबूक यासारख्या सोशल मीडियायाचा वापर करु नये असा फतवा काढला आहे. तसेच मुलींनी जीन्स परिधान करण्यावरही निर्बंध घालण्यात आले आहेत. 
 
खापच्या या वादग्रस्त निर्णयावर सर्वत्र टीका होत आहे. तरी खापप्रमुखांनी कठोर निर्णय घेत राहावे, आपण आपल्या समाजाचे रक्षण करण्याच्या दृष्टीनेच हे निर्णय घेत आहोत. 

वेबदुनिया वर वाचा