मुलींचे विवाहाचे वय 21 वर्षे करावे-मद्रास हायकोर्ट

गुरूवार, 9 ऑक्टोबर 2014 (11:17 IST)
वयाच्या 18 व्या वर्षी मुली गाडी चालवणे नोकरी करण्यास फिट असू शकतात. परंतु लग्नासाठी परिपक्व ठरत नाहीत, असे मत मद्रास हायकोर्टाने व्यक्त केले आहे. त्यामुळे मुलींसाठी लग्नाच्या वयाची अट 18 वरून 21 वर्षे करायला हवी, असे हायकोर्टाने म्हटले आहे.
 
मुलांसाठी विवाहाचे वय 21 वर्षे आहे. 17 वर्षांपर्यंत मुले-मुली शाळेत सोबतच मोठे होतात. मग मुलींना 18 व्या वर्षीच परिपक्व कसे मानायचे, असा सवाल करत कोर्टाने कायद्यांत दुरुस्तीची सूचनाही केली.

वेबदुनिया वर वाचा