वाढदिवशी मुलायम सिंह यांची भव्य मिरवणूक काढली जाणार असून त्यासाठी खास लंडनहून व्हिंटेल बग्गी मागविण्यात आली आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर पार्क येथून या मिरवणुकीला सुरूवात होणार असून युनिव्हर्सिटी गेटवर मिरवणूक थांबणार आहे. मिरवणुकीदरम्यान मुलायम यांच्यावर दोन्ही बाजुनी त्यांच्यावर पुष्पाचा वर्षाव करण्यात येणार आहे. वाढदिवसानिमित्त रामपूरमध्ये जवळपास दोनशो कमानी, शेकडो बॅनर लावण्यात आले आहेत. या कार्यक्रमाचे लाइव्ह प्रसारण केले जाणार असून त्यासाठी मोठमोठ्या एलईडी स्क्रीन लावण्यात आल्या आहेत. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री अखिलेश सिंह यादव यांच्यासह उत्तर प्रदेश मंत्रीमंडळातील 50 मंत्री उपस्थित राहणार आहेत.