मायमराठीचा पंजाबमध्ये ‘बल्ले बल्ले’

बुधवार, 11 मार्च 2015 (10:20 IST)
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन घुमानमध्ये एक स्टेट इव्हेंट अर्थात राष्ट्रीय उत्सव म्हणून साजरा करण्याचा ऐतिहासिक निर्णय पंजाब सरकारने घेतला आहे. त्यामुळे मायमराठीचा पंजामध्ये ‘बल्ले बल्ले होणार आहे. विशेष म्हणजे संमेलनाचा संपूर्ण खर्च करण्याची तयारीही पंजाब सरकारने दर्शविली आहे.
 
संमेलनाच्या निमित्ताने घुमान विकास मंडळाची स्थापना करण्याची घोषणा पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांनी केली असल्याची माहिती स्वागताध्यक्ष भारत देसडला व   संजय नहार यांनी  दिली. देसडला व नहार यांच्या उपस्थितीत पंजाबचे मुख्य सचिव, तसेच इतर अधिकाºयांसोबत मुख्यमंत्री बादल यांनी संमेलनाच्या तयारीचा आढावा घेतला. याबाबत माहिती देताना देसडा म्हणाले, संमेलनाचा संपूर्ण खर्च करण्याची इच्छा बादल यांनी दर्शविली. पंजाबचे अतिरिक्त मुख्य सचिव सुरेशकुमार यांच्याकडे संमेलनाच्या तयारीची संपूर्ण व्यवस्था सोपविण्यात आली आहे.
 
दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह पाच माजी मुख्यमंत्री संमेलनाला उपस्थित राहणार आहेत. संमेलनकाळात अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी दोन हेलिकॉप्टरची व्यवस्था करण्यात आली आहे.

वेबदुनिया वर वाचा