पश्चिम बंगालमधील पश्चिम मिदनापुर भागातील गोलतोर येथील बारानगडोना गावात हल्ला चढवत माओवाद्यांनी एका माकप नेत्याची गोळ्या झाडून हत्या केली.
पोलिस अधीक्षक एम के वर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार रात्री 11 नंतर गावात सहा ते सात माओवाद्यांनी हल्ला चढवला. यानंतर त्यांनी या नेत्याची त्याच्या घरापुढेच हत्या केली. या भागात माओवाद्यांचा दबदबा असल्याने पोलिसही भागात जाण्यास घाबरतात.
यापूर्वी माओवादी नेता जलाधर महतों याची माओवाद्यांनी अहरिसोल भागात हत्या केली होती.