माओवाद्यांनी रेल्वे रुळ उडवले; रेल्वे सेवा विस्कळीत

बुधवार, 23 जुलै 2014 (14:15 IST)
बिहारमधील गया येथे माओवाद्यांनी स्फोटकांच्या साह्याने रेल्वे  मार्ग उडवल्याने रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. दिल्ली- हावडा  रेल्वे सेवेला मोठा फटका बसला आहे. दिल्ली-भुवनेश्वर एक्स्प्रेस  उडवण्याचा माओवाद्यांचा इरादा असावा, असा संशय पोलिसांनी व्यक्त  केला आहे.
 
गया जिल्ह्यातील इस्लामाइलपूर ते रफीगंज या स्थानकादरम्यानचा  रेल्वे रुळ माओवाद्यांनी स्फोटकांच्या साह्यांने उडवला. स्फोटामुळे या  मार्गावरून जाणार्‍या राजधानी एक्स्प्रेसचे इंजिन रुळावरून घसरले.  प्रसंगावधान राखून या मार्गावरून राजधानी एक्स्प्रेस न पाठवण्याचा  वेगळीच निर्णय घेण्यात आल्याने मोठा अनर्थ टळला. या घटनेबाबत  रेल्वेमंत्री सदानंद गौडा यांनी अहवाल माग‍वला आहे.

वेबदुनिया वर वाचा