माओवाद्यांकडून इटलीच्या दोन पर्यटकांचे अपहरण

वेबदुनिया

सोमवार, 19 मार्च 2012 (12:02 IST)
WD
ओडिशाच्या कंधमाल-गंजाम सीमेवर काल रात्री माओवाद्यांनी इटलीच्या दोन पर्यटकांचे अपहरण केले. माओवाद्यांनी कंधमाल जिल्ह्यात दोन लोकांचे अपहरण केल्याची माहिती आहे, असे पोलीस महासंचालक मनमोहन प्रहराज यांनी सांगितले. गृहसचिव यू. एन. बहरा यांनीही या घटनेला दुजोरा दिला आहे.

कंधमाल व गंजाम जिल्ह्यांच्या सीमेवर ही घटना घडल्याचे समजते. परिस्थितीवर आम्ही लक्ष ठेवून आहोत, असे कंधमालचे जिल्हाधिकारी आर. पी. पाटील म्हणाले. पुरीहून अन्य दोन लोकांसोबत १२ मार्चला कंधमालच्या दौर्‍यावर आलेल्या या दोन इटालियन पर्यटकांची नावे बोसुस्को पाओलो आणि क्लाडियो कोलांगेल अशी आहेत. यापैकी एक दहा वर्षांपासून पुरीत राहत होता. माओवाद्यांनी काल मध्यरात्रीनंतर काही खासगी वाहिन्यांवरून या दोन पर्यटकांचे अपहरण केल्याचा दावा केला होता. राज्य सरकारने प्रतिबंध घातल्यानंतरही दुर्गम भागात जाऊन आदिवासींची आक्षेपार्ह छायाचित्रे घेणार्‍या दोन विदेशी पर्यटकांचे आम्ही अपहरण केले आहे, असे माओवाद्यांनी सांगितले.

वेबदुनिया वर वाचा