वारंवार समन्स बजावूनही मल्ल्या न्यायालयात हजर झाले नाहीत. त्यामुळे त्यांना हजर करण्यासाठी सरकारी यंत्रणेने हस्तक्षेप करणे गरजेचे झाले असल्याचे न्यायालयाने म्हटले. डायल कंपनीने धनादेश न वटल्या प्रकरणी मल्ल्यांना कोर्टात खेचले आहे. मल्ल्यांची कंपनी किंगफिशर एअरलाईन्सने डायलला एक कोटी रूपयांचा धनादेश दिला होता. मात्र, तो वटला नाही.
महानगर दंडाधिकारी सुमीत आनंद यांनी मल्ल्या यांना ४ नोव्हेंबर रोजी न्यायालयात हजर करण्याचे आदेश दिले. परराष्ट्र मंत्रालयाद्वारे अजामिनपात्र अटक वारंट बजावले जावे, असे या आदेशात म्हटले आहे. विजय मल्ल्या सध्या लंडनमध्ये असल्याचे सांगितले जाते.