'मला राहुल गांधींसोबत लग्न करायचंय'

शुक्रवार, 21 नोव्हेंबर 2014 (14:40 IST)
कॉंग्रेसचे युवराज असलेले राहुल गांधी यांच्याशी विवाह करायचा असल्याचे एका तरुणीने म्हटले आहे. कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी या चांगल्या नाहीत. त्या आम्ही दोघांची भेट होऊ देत नसल्याचेही या तरुणीने म्हटले आहे. राहुल यांनी भेट घेण्यासाठी आपण चार वर्षांपासून प्रयत्न करत असल्याचे या तरुणीने पोलिसांना सांगितले.  
 
ही तरुणी सिंकदरा भागातील रहिवासी आहे. राहुल गांधी आणि आपली दोन वेळा भेट झाली असून ते आपल्या चांगले ओळखतात, असेही तरुणीने पोलिसांना सांगितले आहे. मात्र, सोनिया गांधी यांनी नकार दिल्यामुळे ते माझ्यासोबत विवाह करण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप या तरुणीने केला.

वेबदुनिया वर वाचा