मला मूल नकोय; रामदेवबाबा भडकले

शनिवार, 2 मे 2015 (11:29 IST)
दिव्य पुत्रजीवक बीज हे औषध केवळ मुलगा व्हावा यासाठी नव्हे तर ज्यांना मूल होत नाही त्यांच्यासाठी आहे, असा खुलासा योगगुरू रामदेवबाबा यांनी केला. माझ्यासारख्या फकिराच्या आड मोदींसारख्या वजिराला बदनाम करण्याची खेळी काही खासदार करीत आहेत असा प्रत्यारोप करताना ते चांगलेच भडकले. मला आणि मोदी या दोघांनाही मूल नको आहे, असेही ते संतापाच्या भरात म्हणाले.

बाबा रामदेव यांच्या ‘दिव्य पुत्रजीवक बीज’ या औषधामुळे मुलगाच होतो, या दाव्यासह औषधाची विक्री सुरूअसल्याचा आरोप संयुक्त जनता दलाचे खासदार के.सी. त्यागी यांनी केला होता. याप्रकरणी कारवाईचे आश्वासनही दिले होते.

बाबा रामदेव यांनी याबाबत पत्रकार परिषदेत खुलासा केला. आयुवेदाचे ज्ञान नसलेले लोक अशी चुकीची माहिती पसरवित असल्याचा आरोप करून खोट्या आरोपांबद्दल सबंधित खासदारांनी क्षमा मागावी अशी मागणी त्यांनी केली.

वेबदुनिया वर वाचा