मला बाबाच राहू द्या: रामेदव बाबा

मंगळवार, 21 एप्रिल 2015 (11:39 IST)
चंदिगड: योगगुरू रामदेव बाबा यांनी हरियाना सरकारने देऊ केलेला कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा घेण्यास नकार दिला आहे. त्यांनी म्हटले की मी बाबा आहे आणि मला बाबाच राहू द्या.

हरियाना सरकारने रामदेव बाबांना कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला होता. सोनेपत येथील एका कार्यक्रमात बाबांना कॅबिनेट मंत्रिपद बहाल करण्यात येणार होते. पण रामदेव बाबांनी हे पद स्वीकारण्यास नकार दिला.

रामदेव बाबा म्हणाले की मी संन्यासी आहे आणि मला समाज सेवा करायची आहे आणि त्यासाठी मला मंत्रिपदाची गरज नाही. रामदेव बाबांनी लोकसभा निवडणुकीत भाजपला पाठिंबाही दिला होता.

वेबदुनिया वर वाचा