मध्यप्रदेशात दिल्ली गँगरेपची पुनरावृत्ती

मंगळवार, 22 एप्रिल 2014 (11:56 IST)
देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत धावत्या बसमध्ये एका तरुणीवर सामूहिक बलात्काराच्या घटनेने संपूर्ण देश हादरला होता. दिल्ली गँगरेपची रविवारी (20 एप्रिल) मध्यप्रदेशात पुनरावृत्ती झाली. सिंगरौली जिल्ह्यात एका अल्पवयीन दलित मुलीवर पाच नराधमांनी धावत्या बसमध्ये बलात्कार करून तिला बसबाहेर फेकल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नलहटानी गावाजवळ रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्ध अवस्थेत एक मुलगी नागरिकांना आढळली. तिला
तातडीने जिल्ह्या रुग्णालयात दाखल करण्‍यात आले. पोलिसांना तिने आपबिती सांगितली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी तिच्या नातेवाईकाच्या गावाहून घरी परत जात येत होती. सिद्दीकी ट्रॅव्हल्सच्या बस चालकाने तिला लिफ्ट दिली. त्या बसमध्ये चालक आणि क्लिनरसह एकूण पाच जण होते. मुलगी बस बसल्यानंतर सगळे मिळून तिची छेड काढत होते. तिने त्यांना विरोध केला बस थांबवायला सांगितली. परंतु त्यांना तिचे काही एक ऐकले नाही. तिने बचावासाठी आरडाओरड केली. परंतु बसच्या खिडक्या बंद केल्या होत्या. त्यानंतर त्यांनी धावत्या बसमध्ये तिच्यावर आळीपाळीने सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर धावत्या बसमधून तिला खाली फेकून दिले. या घटनेत मुलीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. पोलिसांत गुन्हा दाखल केला असून सिद्दीकी ट्रॅव्हल्सच्या चालकासह अन्य आरोपींचा शोध घेत आहेत. 

वेबदुनिया वर वाचा