भ्रष्टाचारी न्यायाधीशाला बढती; मार्कंडेय काटजू यांचा गौप्यस्फोट

मंगळवार, 22 जुलै 2014 (11:06 IST)
भ्रष्टाचाराचा एक नव्हे तर अनेक आरोप असलेल्या एका न्यायाधीशाला बढती देण्यात आल्याचा गोप्यस्फोट प्रेस काऊंसिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष आणि सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायमूर्ती मार्कंडेय काटजू यांनी केला आहे. तसेच भ्रष्ट न्यायाधीशाला एका राजकीय पक्षाने वरदहस्त दिल्याचाही आरोप काटजू यांनी केला आहे.

मार्कंडेय काटजू यांनी आपल्या ब्लॉगवर गौप्यस्‍फोट केला आहे. काटजू यांच्या दाव्यामुळे न्यायव्यवस्थेतील भ्रष्टाचाराचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. काटजू यांच्या दाव्यानुसार संबंधित न्यायाधीशाच्या कार्यकाळात मद्रास हायकोर्टातील अनेक न्यायाधीशांनी त्यांच्याविरोधात अनेक तक्रारी नोंदवल्या होत्या. मात्र, मद्रास हायकोर्टाच्या एका मुख्य न्यायाधिशांनी आपल्या अधिकाराचा वापर करत ही सर्व प्रकरणे रद्द ठरवत संबंधित न्यायाधीशाला अ‍ॅडिशनल जज बनवले. विशेष म्हणजे  2004 मध्ये आपण मद्रास हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश बनेपर्यंत संबंधित न्यायाधीश पदावर कायम होते असेही काटजू यांनी सांगितले. तामिळनाडूतील एका महत्वाच्या राजकीय नेत्याला एका प्रकरणात जामीन दिल्याने त्याचा त्याला भक्कम पाठिंबा दिल्याचे काटजू यांनी ब्लॉगवर लिहिले आहे. 

वेबदुनिया वर वाचा