भारत माता की जय ची ठेकेदारी चालणार नाही

सोमवार, 25 एप्रिल 2016 (11:34 IST)
भारत माताचे स्वरूप बदलत चालले आहे, भारत माता की जय ची ठेकेदारी चालणार नाही असे खडे बोलही कन्हैया कुमारने सुनावले. तो पुण्यातील बालगंधर्व सभागृहातील सभेत बोलत होता.
 
मोदीजी, 'मन की बात' कराच, पण कधीतरी मराठवाड्याबद्दलही बोला. केवळ जाहिरातबाजीवर खर्च करुन योजना यशस्वी होत नाहीत', 'राष्ट्रवाद शब्दामागे ब्राह्मणवादाचा छुपा अजेंडा आहे, अशी टीका कन्हैयाने केली.
 
भारत मातेची अडचण नाही पण कधी रोहित वेमुलांच्या आईला भेटा, त्या आईची वेदना काय असेल जिच्या मुलावर चप्पल भिरकावली जाते, मुलीवर बलात्कार होत आहेत. तुमची संवेदना नष्ट झाली का? असा सवालही त्यांने उपस्थित केला. देशातील व्यवस्था आणि परंपरा मिठवायची असेल तर पुण्याची पारंपरिक पगडीतील पिवळी पट्टी निळी करा, असे आवाहन कन्हैय्या कुमारनी केले.

वेबदुनिया वर वाचा