भारत पूर्वीपासूनच हिंदूराष्ट्र- फ्रान्सिस डिसुझा

शनिवार, 26 जुलै 2014 (11:05 IST)
भारत हा पूर्वीपासून हिंदूराष्ट्र आहे. त्यामुळे वेगळे हिंदुराष्ट्र बनवण्याची आवश्यकता नसल्याचे मत गोव्याचे उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसुझा यांनी व्यक्त केले आहे. डिसुझा यांचे हे मत गोव्याचे मंत्री दीपक धवळीकरांना समर्थन देणारे आहे. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. 
 
डिसूझा म्हणाले, भारतात राहणारा प्रत्येक व्यक्ती हिंदू आहे. मी ख्रिश्चन असलो तरी हिंदूच आहे. भारत पूर्वीपासूनच हिंदू राष्ट्र होते आणि नेहमीच राहाणार आहे. 
 
दरम्यान, गोमंतक पक्षाचे नेते दीपक धवळीकर यांनी गोवा विधानसभेत भारताला हिंदू राष्ट्र बनवण्यासंदर्भात वक्तव्य केले होते. मला खात्री आहे की नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात भारत एक हिंदू राष्ट्र बनेल. मात्र, यावर स्पष्टीकरण देताना धवळीकरांनी आपल्या वाक्याला देशाच्या विकासाशी जोड दिली होते. नंतर दीपक धवळीकरांच्या या वक्तव्याचा सर्वच स्तरांतून विरोध करण्यात आला. भाजप समर्थक नेत्यांनी अशा प्रकारचे वक्तव्य करावे, ही चिंतेची बाब असल्याचे काँग्रेसचे नेते रशिद अल्वी म्हटले आहे. 
 
भारतात 70 टक्के लोकांनी भाजपला निवडले नाही. यामुळे देशात अस्थिरता निर्माण होईल, असे जदयू नेते अली अन्वर यांनी म्हटले आहे. भारत देश सगळ्यांचा आहे, असे मत समाजवादी पक्षाचे नेते नरेश आग्रवाल यांनी मांडले आहे. या प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी सीपीआय नेते अतुल अंजान यांनी केली आहे. 

वेबदुनिया वर वाचा