भारत करणार अद्यावत क्षेपणास्त्राची खरेदी

सोमवार, 12 ऑक्टोबर 2015 (09:50 IST)
नवी दिल्ली- आपली एरोस्पेस सुरक्षा वाढवण्यासाठी भारताने रशियाच्या नवीन जनरेशनची एस-400 वायू सुरक्षा क्षेपणास्त्र यंत्रणा खरेदी करण्याची तयारी केली आहे. याबाबत मंत्रालयाकडे प्रस्ताव देण्यात आला आहे. या क्षेपणास्त्राच्या या क्षेपणास्त्राच्या माध्यमातून 400 किमी परिसरात येणार्‍या एरोक्राफ्ट, फाइटर जेट्स, स्टील्थ प्लेन, क्षेपणास्त्र आणि ड्रोन यांच्यावर हल्ला केला जाऊ शकतो. अशा प्रकारचे 12 क्षेपणास्त्र विकत घेण्याची योजना भारत सरकारने आखली आहे.
 
यापूर्वी हीच यंत्रणा खरेदी करण्यासाठी चिनने रशियासोबत 3 बिलियन डॉलरचा करार केला आहे. 
 
रशियाची एस-400 सुरक्षा यंत्रणेत वेगवेगळ्या क्षमतेचे तीन क्षेपणास्त्र आहेत. हे सुपरसोनिक आणि हापरसोनिक क्षेपणास्त्र आहे. 120 -400 किलोमीटरअंतरात येणार्‍या कोणत्याही हल्ल्यावर प्रतिहल्ला करण्याची त्याची क्षमता आहे. एवढेच नाही तर ते जमिनीवरून हवेत मारा करून रडारवर पकडण्यात न येणार्‍या स्टील्थ मोडच्या फिफ्थ जनरेशन फाटर जेट्सला (अमेरिकन एफ-35 फाटर जेट) खाली पाडू शकते, असा दावा रशियाने केला आहे.
 

वेबदुनिया वर वाचा