ब्रिटिश पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांचा नकार!

वेबदुनिया

शुक्रवार, 13 जानेवारी 2012 (12:35 IST)
ब्रिटिश पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांनी "बीबीसी' वृत्तवाहिनीच्या एका विशेष कार्यक्रमात भारताची मानहानी करणारे वक्तव्य झाल्यासंदर्भात माफी मागण्यास आज (शुक्रवार) इन्कार केला. याप्रकरणी ब्रिटनमधील भारतीय उच्चायुक्ताने वृत्तवाहिनीकडून स्पष्टीकरण मागितले आहे.

यासंदर्भात ब्रिटिश पंतप्रधान कार्यालयाने खुलासा करीत म्हटले आहे, की "बीबीसी' किंवा इतर कोणत्याही माध्यम समूहाच्या संपादकीय निर्णयांची जबाबदारी ब्रिटिश सरकार घेऊ शकत नाही. हे प्रकरण सर्वथा "बीबीसी'शी संबंधित आहे.

वेबदुनिया वर वाचा