बैलगाडी हाकण्यासाठी लागणार आता परवाना!

गुरूवार, 2 ऑक्टोबर 2014 (10:41 IST)
बैलगाडी आणि घोडागाडी चालवण्यासाठीही परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स) अनिवार्य आहे. विशेष म्हणजे  आता यासाठी परीक्षाही द्यावी लागेल. ही परीक्षा उत्तीर्ण झाल्याशिवाय रस्त्यावर घोडागाडी किंवा बैलगाडी चालवता येणार नाही. केंद्र सरकारच्या रस्ते आणि वाहतूक सुरक्षा विधेयकात याबाबत तरतूद आहे. 
 
बैलगाडी चालकांना ड्रायव्हिंग लायसन्सच्या स्वरूपात एक प्रमाणपत्र देण्यात येईल. या गाड्या मग भाड्यानेही देऊ शकणार नाहीत. नव्या विधेयकाच्या परिशिष्ट ‘अ’मध्ये ही तरतूद केली आहे.
 
बैलगाडीसारख्या दोन चाकी वाहनांचा कोणी व्यावसायिक वापर करत असेल तर चालकाचे वय कमीत कमी 20 वर्षे असणे सक्तीचे करण्यात आले आहे.  दोन तासांच्या परीक्षेत मौखिक प्रात्यक्षिक असेल. मौखिक परीक्षेत वाहतुकीचे नियम, चिन्हे आदी माहिती तर प्रात्यक्षिकात बैल मालकाचे किती ऐकतो, हे पाहिले जाईल. 

वेबदुनिया वर वाचा