बुटासिंग यांच्या घरातून बेकायदा शस्त्रे जप्त

राष्ट्रीय अनुसूचित जाती व जमाती आयोगाचे अध्यक्ष बुटासिंग यांच्या दक्षिण दिल्लीस्थित घरातून आज सकाळी तीन विनापरवाना पिस्तूल व ३८ काडतुसे सापडली.

नाशिकच्या एका ठेकेदाराकडून लाच घेण्याच्या प्रकरणात बुटासिंह यांचे चिरंजीव सरबज्योतसिंह यांना सीबीआयने काल अटक केली आहे. हत्यारे सापडल्यानंतर सरबज्योतविरूद्ध निजामुद्दिन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आज बुटासिंह यांची चौकशी होणार आहे.

वेबदुनिया वर वाचा