बिहारमधील परिस्थिती सुधारण्यासाठी बिहारला विशेष दर्जा देण्याची मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केल्याची माहिती बिहारचे मुख्यमंत्री नीतिशकुमार यांनी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर ते बोलत होते. बिहारचे मुख्यमंत्री नीतिशकुमार यांनी गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.