बिग बींना पद्म विभूषण, भंसाली यांना पद्म श्री

सोमवार, 30 मार्च 2015 (14:39 IST)
येथे सोमवारी राष्ट्रपती भवनात बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांना पद्म विभूषण आणि चित्रपट निर्माता-निर्देशक संजय लीला भंसाळी यांना पद्म श्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.  
 
हे पुरस्कार चित्रपट जगतामध्ये त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानासाठी देण्यात आले आहे. स्वत: राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी ह्या दोघांना हे पुरस्कार दिले.  
 
अमिताभ यांनी वर्ष 1969मध्ये चित्रपट 'सात हिंदुस्तानी'मधून आपल्या करियरची सुरुवात केली होती आणि आतापर्यंतचा त्यांनी केलेला  शेवटचा चित्रपट 'षमिताभ' आहे. 'जंजीर', 'अभिमान', 'सौदागर', 'रोटी, कपड़ा और मकान', 'दीवार', 'शोले', 'डॉन', 'लावारिस', 'सत्ते पे सत्ता', 'नमक हलाल', 'कूली', 'आक्रोश', 'चीनी कम', 'निशब्द', 'सरकार राज', 'ब्लैक' और 'पा'सारख्या चित्रपटांमध्ये अमिताभच्या अभिनयाची प्रशंसा करण्यात आली आहे. बिग बी लवकरच चित्रपट 'पीकू' आणि 'वजीर'मध्ये आपल्यासमोर येणार आहे.   
 
दुसरीकडे संजय लीला भंसाळीने 'हम दिल दे चुके सनम', 'देवदास', 'ब्लैक', 'सांवरिया', 'गुजारिश' आणि 'गोलियों की रासलीला राम-लीला' सारखे आयकॉनिक चित्रपट बनवून प्रेक्षकांचा मनात घरे केले आहे. भंसाळी सध्या 'बाजीराव मस्तानी'च्या निर्दशनात व्यस्त आहे.  त्याशिवाय पंडित मदनमोहन मालवीय यांना मरणोपरांत भारत रत्न पुरस्कार देण्यात आले.

वेबदुनिया वर वाचा