बंगालचे नाव बदलण्याचा प्रस्ताव मंजूर

मंगळवार, 30 ऑगस्ट 2016 (11:26 IST)
पश्चिम बंगाल विधानसभेने राज्याचे नाव बदलण्याचा प्रस्ताव मंजूर केला. हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्यात येणार आहे.

केंद्राकडून हिरवा कंदील मिळाल्यावर पश्चिम बंगालला बंगाली भाषेत ‘बांगला’, इंग्रजीत ‘बेंगाल’ आणि हिंदीत ‘बंगाल’ या नावाने ओळखले जाईल.

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगाल या नावावर नाराजी व्यक्त केली होती. पश्चिम बंगालमधील अनेक प्रशासकीय अधिकारी आणि अन्य मंत्र्यांनीही वारंवार हा मुद्दा उपस्थित केला होता. फाळणीच्या वेळी ब्रिटीश राज्यकर्त्यांनी बंगालचे पश्चिम बंगाल आणि पूर्व बंगाल असे विभाजन केले होते. यातले पूर्व बंगाल हे पाकिस्तानच्या ताब्यात होते.

1971 मध्ये पूर्व बंगालला पाकिस्तानमधून स्वातंत्र्य मिळाले आणि बांगलादेश अस्तित्वात आला. पूर्व बंगालच अस्तित्वात नसेल पश्चिम बंगाल असे नाव कायम ठेवण्यात काहीच अर्थ नसल्याचा दावा यापूर्वी वारंवार करण्यात येत होता.

वेबदुनिया वर वाचा